
सुधागड-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधागड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका प्रभावी स्थानिक नेत्याच्या एका मोठ्या पक्षात प्रवेशाची शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
सध्या आचारसंहिता लागू असल्याने कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी संबंधित नेत्याच्या हालचालींवरून त्यांच्या संभाव्य निर्णयाबाबत चर्चा रंगली आहे. स्थानिक पातळीवर यामुळे काही गटांत अस्वस्थता निर्माण झाली असून, नव्या नेतृत्वाच्या शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत.
