सुधागड तालुक्यात जांभूळपाडा येथे युतीची बैठक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुधागड-पाली (गौसखान पठाण)  सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील ‘निर्वाणा अलाईव्ह’ येथे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) आणि आरपीआय (अ) यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो संख्येने उपस्थिती होती. दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वात ही बैठक…

Read More

सुधागडमध्ये पक्षांतराच्या चर्चांना उधाण?; राजकीय हालचालींना वेग

  सुधागड-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधागड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका प्रभावी स्थानिक नेत्याच्या एका मोठ्या पक्षात प्रवेशाची शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. सध्या आचारसंहिता लागू असल्याने कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी संबंधित नेत्याच्या हालचालींवरून त्यांच्या संभाव्य निर्णयाबाबत चर्चा रंगली आहे….

Read More

जि.प. व पं.स.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग ; आरक्षणाच्या गणितामुळे अनेक नेते अडचणीत

सुधागड-पाली(गौसखान पठाण )दि. 15 जानेवारी 2026 रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र नुकतेच निवडणूक आयोगाने या निवडणूका जाहीर करून आचारसंहिता लागू केल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी जाहीर करण्यात सर्वच पक्षांकडून विलंब होत असल्याचे चित्र सध्या…

Read More

संच मान्यता अंतिम टप्प्यात ; ऑनलाईन माहितीची पडताळणी युद्धपातळीवर सुरू

अलिबाग(रत्नाकर पाटील) 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यतेसाठी लागणारी माहिती ही यू-डायस प्लस पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नोंदींवर आधारित राहणार आहे. ही संच मान्यता अंतिम करण्यासाठी विद्यार्थ्यांची आकडेवारी ही यू-डायस तर शिक्षकांची माहिती ही शालार्थ प्रणालीवरून घेण्यात आली आहे. गुरूजींची पदे राहणार की जाणार यासाठी संच मान्यता महत्वाची असून सध्या ही माहिती अंतिम करण्याचे काम सुरू…

Read More

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य चे आयोजन

अलिबाग (रत्नाकर पाटील) स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अमली पदार्थमुक्त भारत या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड–अलिबाग यांच्या विद्यमाने अलिबागमध्ये भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, अलिबाग येथून झाली, तर रॅलीचा समारोप अलिबाग समुद्रकिनारा येथे करण्यात आला. या रॅलीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सेंट मेरी…

Read More

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची वर्‍हाड-जांभूळपाडा ग्रामपंचायतीस भेट

सुधागड-पाली (गौसखान पठाण ) दि. १३ जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी वर्‍हाड-जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीस भेट देऊन ग्रामविकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) विशाल तनपुरे, गट विकास अधिकारी लता मोहिते,…

Read More

क्षयरुग्णांना पोषण आहार वाटप;निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

अलिबाग(रत्नाकर पाटील) क्षयरोगमुक्त रायगड जिल्ह्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महानगर गॅस लिमिटेडने मुंबई यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून 550 क्षयरुग्णांना 3 हजार 300 पोषण आहार फूड बास्केटचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते जिल्हा परिषद येथे करण्यात आले. जिल्हाधिकारी किशन जावळे व राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्याना निक्षय…

Read More

जिल्ह्यातील हजारो आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार विमा;भरपाईचा अडथळा दूर

अलिबाग(रत्नाकर पाटील) दिर्घकाळ रखडलेली विमा नुकसान भरपाई आता रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे विमा भरपाई न मिळण्याचा अडथळा आता दूर झाला असून शेतकऱ्यांना विमा दोन दिवसात जमा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जागतीक हवामानाचा फटका रायगड जिल्ह्यातील आंबा…

Read More

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे बिगुल वाजलं;रायगडमध्ये आचारसंहिता लागू

अलिबाग (रत्नाकर पाटील) प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.13) सायंकाळी जाहीर केला. रायगड जिल्हा परिषदेच्या 59, तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी ही निवडणूक होणार असून, मतदान गुरुवारी (दि.5) फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद…

Read More