कामोठे परिसरात भाजप महायुती भक्कम; प्रभाग १३मधील उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील – लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (साबीर शेख): कामोठे परिसरात भाजप महायुतीची ताकद भक्कम असून येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची हवा आधीच गुल झाली आहे, विकासाचा दृष्टीकोन घेऊन अनेक विकासाची कामे भाजपच्यावतीने झाली आहेत, त्यामुळे प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्‌याने विजयी होतील. असा विश्वास महानगरपालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला….

Read More