सुधागड तालुक्यात जांभूळपाडा येथे युतीची बैठक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुधागड-पाली (गौसखान पठाण) सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील ‘निर्वाणा अलाईव्ह’ येथे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) आणि आरपीआय (अ) यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो संख्येने उपस्थिती होती. दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वात ही बैठक…
