मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची वर्‍हाड-जांभूळपाडा ग्रामपंचायतीस भेट

सुधागड-पाली (गौसखान पठाण )

दि. १३ जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी वर्‍हाड-जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीस भेट देऊन ग्रामविकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) विशाल तनपुरे, गट विकास अधिकारी लता मोहिते, सहाय्यक गट विकास अधिकारी घरत, तसेच विस्तार अधिकारी (ग्रा.प.) अहिरे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या विविध योजनांची माहिती घेतली आणि स्थानिक पातळीवर होत असलेल्या विकासकामांचे निरीक्षण केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत ग्रामविकासासाठी अधिक प्रभावी नियोजन करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या सहकार्याने गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *